Lord Dattatreya

श्री दत्तबावनी

(Datta Bavani)

Shri Ranga Avadhoot Maharaj

Datta Bavani is a deeply devotional hymn of surrender (Prapatti) to Lord Dattatreya, acknowledging Him as the ultimate refuge, family, wealth, and supreme Lord everywhere.

श्री दत्तबावनी (मराठी)
जय योगीश्वर दत्त दयाळ ।
तूंच एक जगती प्रतिपाळ ॥ १॥
अत्र्यनुसये करूनि निमित्त ।
प्रगटसि जगतास्तव निश्चित ॥ २॥
ब्रह्माऽच्युतशंकर अवतार ।
शरणांगतासि तूं आधार ॥ ३॥
अंतर्यामी ब्रह्यस्वरूप ।
बाह्य गुरु नररूप सुरूप ॥ ४॥
काखिं अन्नपूर्णा झोळी ।
शांति कमंडलु करकमळी ॥ ५॥
कुठें षड्भुजा कोठें चार ।
अनंत बाहू तूं निर्धार ॥ ६॥
आलो चरणी बाळ अजाण ।
दिगंबरा, उठ जाई प्राण ॥ ७॥
ऐकुनि अर्जुन-भक्ती-साद ।
प्रसन्न झाला तूं साक्षात् ॥ ८॥
दिधली ऋद्धी सिद्धी अपार ।
अंती मोक्ष महापद सार ॥ ९॥
केला कां तूं आज विलंब? तुजविण मजला ना आलंब ।

१०॥
विष्णुशर्म द्विज तारुनिया ।
श्राद्धिं जेंविला प्रेममया ॥ ११॥
जंभे देवा त्रासविले ।
कृपामृते त्वां हांसविलें ॥ १२॥
पसरी माया दितिसुत मूर्त ।
इंद्रा करवी वधिला तूर्त? ॥ १३॥
ऐसी लीला जी जी शर्व ।
केली, वर्णिल कैसी सर्व? ॥ १४॥
घेई आयु सुतार्थी नाम ।
केला त्यातें तूं निष्काम ॥ १५॥
बोधियले यदु परशुराम ।
साध्य देव प्रह्लाद अकाम ॥ १६॥
ऐसी ही तव कृपा अगाध ।
कां न ऐकसी माझी साद ॥ १७॥
धांव अनंता, पाहि न अंत ।
न करी मध्येच शिशुचा अंत ॥ १८॥
पाहुनि द्विजपत्नीकृत स्नेह ।
झाला सुत तूं निःसंदेह ॥ १९॥
स्मर्तृगामी कलितार कृपाळ ।
जडमुढ रजका तारी दयाळ ॥ २०॥
पोटशुळी द्विज तारियला ।
ब्राह्यणश्रेष्ठी उद्धरिला ॥ २१॥
सहाय कां ना दे अजरा? ।
प्रसन्न नयने देख जरा ॥ २२॥
वृक्ष शुष्क तूं पल्लविला ।
उदास मजविषयी झाला ॥ २३॥
वंध्या स्त्रीची सुत-स्वप्नें ।
फळली झाली गृहरत्नें ॥ २४॥
निरसुनि विप्रतनूचे कोड ।
पुरवी त्याच्या मनिचें कोड ॥ २५॥
दोहविली वंध्या महिषी ।
ब्राह्मण दारिद्र्या हरिसी ॥ २६॥
घेवडा भक्षुनि प्रसन्न-क्षेम ।
दिधला सुवर्ण घट सप्रेम ॥ २७॥
ब्राह्मण स्त्रीचा मृत भ्रतार ।
केला सजीव, तूं आधार ॥ २८॥
पिशाच्च पीडा केली दूर ।
विप्रपुत्र उठवीला शूर ॥ २९॥
अंत्यज हस्तें विप्रमदास ।
हरुनी रक्षिले त्रिविक्रमास ॥ ३0॥
तंतुक भक्ता क्षणांत एक ।
दर्शन दिधले शैलीं नेक ॥ ३१॥
एकत्र वेळी अष्टस्वरूप ।
झाला अससी, पुन्हां अरूप ॥ ३२॥
तोषविले निज भक्त सुजात ।
दाखवुनि प्रचिती साक्षात ॥ ३३॥
हरला यवननृपाचा कोड ।
समता ममता तुजला गोड ॥ ३४॥
राम-कन्हैया रूपधरा ।
केल्या लीला दिगंबरा! ॥ ३५॥
शिला तारिल्या, गणिका, व्याध ।
पशुपक्षी तुज देती साद ॥ ३६॥
अधमा तारक तव शुभ नाम ।
गाता किती न होती काम ॥ ३७॥
आधि-व्याधि-उपाधि-गर्व ।
टळती भावें भजतां सर्व ॥ ३८॥
मूठ मंत्र नच लागे जाण ।
पावे नर स्मरणे निर्वाण ॥ ३९॥
डाकिण, शाकिण, महिषासूर ।
भूतें, पिशाच्चें, झिंद, असूर ॥ ४०॥
पळती मुष्टी आवळुनी ।
धून-प्रार्थना-परिसोनी ॥ ४१॥
करुनि धूप गाइल नेमें ।
दत्तवावनी जो प्रेमें ॥ ४२॥
साधे त्याला इह परलोक ।
मनी तयाच्या उरे न शोक ॥ ४३॥
राहिल सिद्धी दासीपरी ।
दैन्य आपदा पळत दुरी ॥ ४४॥
नेमे बावन गुरुवारी ।
प्रेमे बावन पाठ करी ॥ ४५॥
यथावकाशे स्मरी सुधी ।
यम ना दंडे त्यास कधी ॥ ४६॥
अनेक रूपी हाच अभंग ।
भजतां नडे न मायारंग ॥ ४७॥
सहस्र नामें वेष अनेक ।
दत्त दिगंबर अंती एक ॥ ४८॥
वंदन तुजला वारंवार ।
वेद श्वास हें तव निर्धार ॥ ४९॥
थकला वर्णन करतां शेष ।
कोण रंक मी बहुकृत वेष ॥ ५०॥
अनुभवतृप्तीचे उद्गार ।
ऐकुनी हंसता खाइल मार ॥ ५१॥
तपसी तत्त्वमसी हा देव ।
बोला जयजय श्री गुरुदेव ॥ ५२॥
॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥

Explore More